कौटुंबिक पार्श्वभूमी:
स्व. उत्तमराव देशमुख (पोलीस पाटील) व श्रीमती साविताबाई देशमुख यांच्या चार अपत्यापैकी संजयभाऊ देशमुख घरातलं जवाबदार अपत्य. वडिलोपार्जित शेती व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी वंशवाळीप्रमाणे घरात वाढलेली जी आजही तेवढीच जीवंत आहे. वडिलांचा गावाप्रती असलेला लळा भाऊंनी जवळून अनूभवला. कर्तबगार, न्यायप्रिय पोलीस पाटील म्हणून वडिलांचा वारसा संजय भाऊंना मिळाला. धरणरूपी संकटामूळे गावावर पूनर्वसनाची वेळ आली; त्यात सुपीक जमिनी गेल्या व त्रोटक मोबदल्यामूळे जीवनचक्र संकटात सापडले. धाकटा भाऊ ईश्वर अगदी नावाप्रमाणे वागले. दोन्ही भावंडांना शिक्षणाप्रती असलेली नितांत श्रद्धा त्यांच्या कामावरून सिद्ध होते. ईश्वर भाऊंची IAS परिक्षामधील यश, सोबतच भाऊंनी परिस्थितीवर मात करून मिळविलेली डिग्री त्यांचा संघर्ष सांगतात. भाऊंनी दिग्रस भागात वंचित, दुर्बल घटकांसाठी केलेली शिक्षणाची सोय वडिलांच्या संस्काराची साक्ष पटवून देतात. ईश्वर भाऊंचा यशस्वी शैक्षणिक प्रवास काळाने घाला घालून २ ऑक्टोबर २००१ रोजी थांबवला. संजय भाऊंना जीवनात झालेल्या सर्वात मोठ्या हानीला हानून पाडले; ते ईश्वर भाऊंच्या स्वप्नांना आकार देत देत.

राजकारणात येण्यामागची कारणे:
प्रत्येक गावात विकासाची, परिवर्तनाची गंगा पोहचावी; कारण देशाचा सर्वांगीण विकासासाठी ग्रामीण विकास हाच मुलभूत गाभा मानला जातो. आपल्या भारत देशात बहुसंख्य लोक ग्रामीण भागात वास्तव्य करतात. आणि बहुतेकजण पारंपारिक शेतीव्यवसायावर चरितार्थ भागवितात. शेतकरी, शेतमजुराचे जीवनमान उंचावे, त्यांना मुख्य प्रवाहात आनन्याच्या धडपडीतून तसेच तरुणाची रोजगाराची धग क्षमविण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि काय केले पाहिजे या मानसिकतेतून एक विकासाचा आराखडा तयार केला. सत्ताधारी याची निष्क्रीयता, उदासीनता बघता लोकाग्रहाखातर आणि काळाची गरज समजून राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला. मोठमोठया, बलदंड, घराणेशाही पक्षांविरोधात दंड थोपटले आणि प्रथमतः अपक्ष म्हणून १९९९मध्ये आमदार आणि नोव्हेंबर २००१मध्ये पून्हा अपक्ष म्हणून निवडून येवून क्रिडाराज्यमंत्री होवून विरोधकांना चितपट करण्याची किमया या लोकनेता भाऊंनी करून दाखविली.

सामाजिक प्रवास:
' संजयभाऊ मित्र मंडळ ', ' ईश्वर प्रतिष्ठाण', यासारख्या सेवाभावी संघटनांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कामे, उपक्रम, स्वयंरोजगार निर्मिती कार्यशाळा व तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन इ. उपक्रम नित्य राबविले जातात. राजकारणाबरोबरच समाजकारणही तितकच रूढलेल आत्तापर्यंच्या प्रवासावरून प्रत्ययास येते. संजयभाऊची प्रेरणा घेत भाऊंच्या सुविद्य पत्नी सौ. वैशालीताई संजयराव देशमुख यांनी ' ईश्वर फाऊंडेशन ' ची स्थापना केली. याचा मुख्य उद्देश महिलांना रोजगारभिमूख बनविने, स्वयंभू बनविने हा आहे. या अंतर्गत विविध उपक्रम जसे की, मोफत शिवणकाम प्रशिक्षण, बचत गटांची निर्मिती व त्यातून व्यवसाय उभारणीसाठी भारिव सहकार्य, मोफत पाककला प्रशिक्षण, कन्या दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणाची सोय इ. लोकोपयोगी कामे सातत्याने होतात आणि अव्याहतपणे होतही आहेत. कोणत्याही संकटाच्यावेळी, आणिबाणीप्रसंगी, महामारीसारख्या परिस्थितीत संजयभाऊ प्रेरित ' संजयभाऊ मित्र मंडळ ' सदैव तत्पर असते. रक्तदान शिबिरे, अन्नदान, गरजू लोकांना उपयोगी वस्तुंचे वाटप, वृद्धांसाठी आरोग्य शिबिरे माणुसकीची भिंत सारखे उपक्रम सतत राबविले जातात.

पदावर असताना केलेली कामे:
संजयभाऊंना विधानसभेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळताच आपल्या विकास कामाचा झंझावात सुरु केला. अनेक लोकोपयोगी कामे (निवडक कामांचा उल्लेख) जसे की, रस्ते, आरोग्य व शैक्षणिक सुविधा, समाजमंदिरे, मंदिराचे जिर्णोद्धार केले; तसेच शासनाच्या योजनांची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करणे हे मात्र भाऊंचे वैशिष्टयच म्हणावे लागेल. संजय भाऊ एक नाही तर दोनदा विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडूण आले; व २००१ मध्ये क्रिडा राज्यमंत्री पदी भाऊंची वर्णी लागली. भाऊ मंत्री असताना दिग्रस सारख्या छोट्या शहरात " अखिल भारतीय कबड्डी " च्या सामन्यांचे यशस्वी आयोजन करून G००d Plaining काय असते? कसे असते? हे दाखविले. संजयभाऊ स्वतः एक कबड्डी खेळाडू आहेत. महाविद्यालयीन जीवनात अनेक प्रतियोगीतेमध्ये सहभागी होते तसेच विद्यापीठस्तरावर आपल्या खेळाची छाप सोडली. एक खेळाडू म्हणून; खेळाडूची भावना समजूण प्रत्येक खेळाडूला पाठबळाची गरज असते म्हणूनच भाऊंनी क्रिडामंत्री असताना खेळाडूना नोकऱ्यामध्ये ५ % आरक्षण मिळावे म्हणून भाऊ शासन दरबारी आग्रही होते. 'खेळात सुद्धा करीअर करता येते. ' ही काळाची गरज ओळखून भाऊंनी उत्तमोत्तम खेळाडू निर्माण व्हावे म्हणून त्यांना हक्काची जागा असावी या जाणिवेतून प्रत्येक तालुक्यात एका क्रिडा संकुलाची उभारणी केली. खेळ व खेळाडूसाठी पोषक वातावरण निर्माण करून अनेक यशस्वी खेळाडूंचे कैवारी बनले." श्रावणबाळ योजना " च्या माध्यमातून कितीतरी कुटुंबांना, वृद्धांना आधार मिळवून दिला. अशी एक ना अनेक विकास कामे संजय भाऊंनी आपल्या राज्यात तसेच मतदारसंघात केली व ती आजही त्याची साक्ष देत आहेत.
