भविष्यातील ध्येय / धोरण:
संजयभाऊंनी आपल्या संपूर्ण राजकिय कारकिर्दमध्ये सामाजिक समरसता हेच प्रमूख ध्येय बाळगले. राजकिय वाटचाल करताना राजकारणात काधिच यशापयशाची पर्वा केली नाही. समता, न्याय, बंधुता या त्रिसूत्रीशी कधी तडजोड केली नाही. प्रस्थापित विरूद्ध संजयभाऊ असाच संघर्ष अनुभवास मिळतो. सत्तासामिकरणात पूर्णतः विकास शक्य नसतो; याला भाऊसुद्धा अपवाद नाही. भाऊंना मिळालेल्या वेळेत अनेकविध कामे झालीत व आधुनिकतेची जोड घेवून नविन योजनांचा, उपक्रमांचा मानस आहे; की ज्यात सर्वात ज्वलंत विषय म्हणजे शेतीसाठी पाणी आणि युवकांच्या हाताला काम; व्यवसाय, नोकऱ्या. आपल्या भागात अरूणावती प्रकल्प असताना सुद्धा त्याचा फायदा मात्र दुसऱ्या ठिकाणी होताना दिसतो. यासाठी 'बॅक वॉटर ओरिगेशन'ची व्यवस्था करणे जास्तित जास्त प्रमाणात ओलीत वाढविणे यासाठी विहिरी, बोअरवेल, शेततळे, रेनहार्वेस्टींग, वॉटर शेड मॅनेजमेंट इ. उपक्रम युद्धपातळीवर राबविणे तसेच युवकांसाठी व्यवसायभिमूख रोजगारभिमूख शिक्षणाच्या सोयी, सुविधा लघुउद्योगांसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (म.औ.वि.म.) सारखे प्रकल्प, स्वयंभू होण्याच्या दृष्टीने महिंलासाठी बचत गटांची निर्मिती व बॅंकांकडून व्यवसाय करण्यासाठी कर्जाची उपलब्धता करून देणे तथा जनसामान्यांसाठी आरोग्य सुविधा सोयीची होईल याची व्यवस्था करण्याचा संकल्प संजयभाऊंचा आहे; आणि जनतेसाठी, सामान्यांच्या कल्याणासाठी संजयभाऊ वचनबद्ध तथा कटिबद्ध आहेत.
शेतकरी:
ही लिंक आमच्याद्वारे वापरली जाते आणि पोस्टचे क्रेडिट आपले सरकार महा डीबीटी(थेट लाभ हस्तांतरण) कडे जाते.
- सर्व कार्य
- भूमीपूजन
- सामाजिक
- स्पर्धा
